Tuesday, 12 April 2016

स्त्री पुरुष समानता


स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? 

स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे.
 

 पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री
  • आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
  • शिक्षणापासून वंचित राहते
  • सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
  • चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते
    (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता.
त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली.
सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदिती ह्यांच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?
ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं.

 

Image result for Equality of Gender- Social Problem.

भारत हा मजबूत कुटुंबव्यवस्था आणि विविध प्रकारचे नातेसंबंध यामुळे ओळखला जातो.
तथाकथित पाश्चिमात्त्य संस्कृतीमुळे आधीच काही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होत आहे.
त्यात वेगवेगळे कायदे करून सरकार किंवा न्यायालय आणखी ते नातेसंबंध बिघडविण्यात हातभार लावत आहे.
***भाग १ : मुलगा आणि मुलगी या नात्यातल्या "मुलगी" कडून असणारे कायदे: ***
पारंपारीक प्रथेनुसार वडील आपल्या मुलाला शिक्षण देवून मोठे करतात आणि मोठेपणी मुलगा त्यांना सांभाळतो.
मुलगा मुलगी समानता यामुळे मुलीलाही मुलाच्याच तोडीचे शिक्षण आज पालक देतात.
मुलीचे लग्न करतांना हुंडा मिळूनही मुलगी नोकरी करते आणि तो पगार सासू-सासऱ्यांना ती देते.
किंवा आजकाल त्याला हुंडा न म्हणता आम्ही स्वखुशीने देतो से म्हटले जाते.
आणि सरकार इकडे कायदा करतं की-सासऱ्याच्या संपत्तीवर सूनेचा हक्क नाही.
असे कसे काय बुवा?
मग सुनेचा पगार सासू-सासऱ्यांना कसा चालतो?
तो मग तीने आई-वडीलांना दिला पाहिजे.
मुलगा मुलगी समानता आली असे वाटत असतांनाच स्त्रीधार्जिण्या कायद्यांमुळे अमाप फायदा फक्त स्त्रीलाच होतो आहे.
मुलगा मुलगी समानतेच्या मी विरोधात नाही. कुणी नसावं सुद्धा.
पण मग जर समानता आहे, तर विशिष्ट कायदे मात्र स्त्रीयांनाच फायदेशीर का?
मग स्त्रीयांना प्रत्येक ठिकाणी आरक्षण कशाला हवे?
मुलगा-मुलगी दोघांचा जर संपत्तीवर "समान" हक्क आहे तर दोघांनीही आई-वडीलांना सांभाळायला हवे.
मुलीनेसुद्धा वडिलांना सांभाळायला हवे. तसे होत नाही.
आणि संपत्ती मध्ये काय काय मोडतं हे कायदा स्पष्ट करेल का?
वडीलांचे पेन्शन ही सुद्धा संपत्ती मानली जाते का?
वडिलांचे रिटायर झाल्यावरचे पैसे ही सुद्ध वडिलांची संपत्ती असते का?
याबाबत कायदा काय सांगतो?
मुळात सरकार अश्या प्रकारचे कायदे जेव्हा करतं तेव्हा घरा घरांत जावून सर्वेक्षण करतं का?
आता मुलीचा सुद्धा वडीलांच्या संपत्तीत अर्धा वाटा असतो असा कायदा आहे.
ती संपत्ती मुलीला मिळाली म्हणजे अर्थातच जावयाला आपोआपच मिळाली.
इकडे सून आणि मुलगा त्या सासू-सासऱ्यांचं सगळ करणार (जे क्रमप्राप्त आणि योग्यच आहे याबद्दल दुमत नाही)
पण सूनेला संपत्तीत वाटा नाही असे कसे काय?
मग मुलाचा अपघाती म्रूत्यू झाल्यास सुनेला मग सासऱ्याचा संपत्तीत काहीच मिळणार नाही असे समजायचे का?
की त्या सूनेला ते तीच्या माहेरी पाठवून देणार?
आणखी एक कायदा असा आहे की मुलाच्या संपत्तीवर वडीलांचा हक्क आहे.
म्हणजे ती संपत्ती पुन्हा वडीलांकडून "मुलीला" आणि पर्यायाने "जावयाला" जाणार.
सगळा "गो गो गो गोलमाल" आहे.
अस कसे काय?
कुणी यावर एक शक्कल शोधून काढील की जो मुलगा आहे तो कुणाचा न कुणाचा जावई सुद्धा असतोच की.
आणि जी मुलगी आहे ती कुणाची न कुणाची सून आहेच की.
होय हे बरोबर आहेच.
पण, मग अशा वेळेस अश्या कायद्यांमुळे "पैशांनी गरीब" असलेल्या वडिलांच्या मुलीशी कुणी लग्न करणारच नाही!
हे योग्य नाही.
आजकाल म्हणतात की, आजकालची मुलं मोठी झाल्यावर आई- वडीलांना सांभाळत नाहीत.
वृद्धाश्रमात पाठवतात वगैरे.
आता हे जे "आजकालचे मुलं" आहेत ती ज्यांची जावई आहेत ते वृद्ध जोडपे मात्र त्या जावयाचे कौतुक करतात.
"जावयाचे आई-वडील जावयाजवळ राहात नाहीत" याचे कारण ते खालीलप्रमाणे देतात:
"त्या जावयाची पत्नी (म्हणजे मुलगी)चांगली आहे हो, पण तीच्या सासू सासऱ्यांचाच स्वभाव खडूस आहे"
म्हणजे प्रत्येक मुलगा आणि सून एकाचवेळेस चांगले आणि वाईट असतो.
कसे काय?
सगळे सापेक्ष असते.
पण कायद्यांमुळे कुणा एकाच्या पारड्यात गरज नसतांना खुप काही येते आणि ज्याला खरोखरी गरज आहे त्याला काहीही मिळत नाही.
***भाग २ : लग्न संस्थेतले पती अणी पत्नी या नात्यामध्ये "पत्नी" कडून असलेले कायदे ***
पती-पत्नी च्या नात्यांत ही तसेच.
बहुतेक घटस्फोटासंदर्भातले कायदे हे स्त्री कडूनच आहेत.
जर मुलगा आणि मलगी समान आहेत तर घटस्फोट घेतांना फक्त पतीनेच पत्नीला का पोटगी द्यावी?
पत्नीही जर कमावती असेल तर पोटगीची गरज नाही आणि फक्त पत्नी कमावती असेल तर पत्नीने पतीला पोटगी द्यायला हवी.
Image result for Equality of Gender- Social Problem.
पती पत्नी यांच्या एकमेकांतील मानसिक छळ हा प्रकारही तसाच आहे. तो कायदा सुद्धा स्त्री कडूनच आहे.
पत्नी मानसीक छळ करत असेल तर त्या संदर्भात कायदा का नाही?
मुलगा आणि मुलगी समान आहेत ना!
स्त्री तर उलट मानसिक दॄष्टया जास्त सक्षम असते.
बहुतांश हार्ट एटॅक पुरुषांनाच येतात.
तरीही फक्त पुरुषच स्त्रीचा मानसिक छळ करतो असे कसे?
निदान कायदा तरी असेच सांगतो.
विविध पॉलिसी काढण्यासाठी सुद्धा पुरुषांवर स्त्रीयांकडून दबाव आणला जातो, असे मी मध्यंतरी वाचले होते तसेच आजकाल पॉलिसीच्या जाहिराती सुद्धा अशाच बनत आहेत, जेणेकरून पत्नी व मुले यांच्या दृष्टीकोनातून वडील म्हणजे कर्ता पुरुष हा मरेपर्यंत पैसे कमावणारी न थकणारी आनी मेल्यानंतरही पैसे देणारी एक मशीन आहे.
***भाग 3 : लिव्ह ईन रिलेशनशीप मधील पुरुष आणि स्त्री या नात्यामध्ये "स्त्री" कडून असलेले कायदे ***
आता तर यावर कडी म्हणजे लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये मजा दोघेही मारणार आणि सोडून जातांना मुलगा मुलीला पोटगीचे पैसे देईल कारण ती त्याच्या पत्नीच्या दर्जाची आहे? असे कसे?
मला तरी या सगळ्या कायद्यांत एकवाक्यता दिसत नाही.
सगळा सावळा गोंधळ आहे.
आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर हा सगळा अगम्य प्रकार वाटतो.
आपल्याला काय वाटते?
कुणी जाणकार सांगेल काय?


स्त्री- पुरूष (अ)समानता

 लग्न स्त्री आणि पुरूष दोघांत होते. पण विवाहित असण्याचे 'लायसन्स' मात्र केवळ स्त्रीलाच घालावे लागते. पुरुषाच्या बाबतीत मात्र असे नाही. अविवाहित आणि विवाहित पुरुष ओळखता येत नाही. ना नावात, ना कपड्यांतून, ना हातातल्या बांगड्यांतून ना बोटातल्या अंगठीतून. स्त्रिया नवर्‍याच्या नावाने कुंकू लावतात, मात्र बायकोच्या नावाने कुंकू लावलेला पुरूष पाहिला आहे? विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखण्यासाठी काहीच उपाय नाही. मात्र, विवाहित आणि अविवाहित स्त्रियांमधील भेद ओळखण्यासाठी बरीच व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे विवाहित आणि विधवा स्त्रियांमधील फरकही ओळखण्याची व्यवस्था आहे.

पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.

विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.

स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का? जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?

पुरुषाच्या उपभोगासाठी योग्य झाल्यावर स्त्रीला बहुमूल्य अलंकारांनी आणि वस्त्रांनी सजविले जाते. पुरुषाच्या उपभोगासाठी 'अयोग्य' झाल्यावर मात्र तिला समाजाच्या कचरापेटीत फेकले जाते. याचा अर्थ आपल्या पुरूषाला खुश करणे, तृप्त करणे एवढेच स्त्रीकडून अपेक्षित आहे का?

समाज असे का करतो? हे बदलले पाहिजे. समानता आता सगळ्या बाबतीत यायला हवी. महिलांनो आता तुम्हीही सर्व दिखाऊ संस्कार, दागिने यांना झुगारून 'मानव' बना.

'तू एक मुलगी आहेस
हे तू विसरू नकोस
तू जेव्हा घराचे दार ओलांडशील
तेव्हा लोक तुझ्याकडे तिरप्या नजरेने बघतीलच
तू जेव्हा गल्ली-बोळातून जाशील
लोक तुझा पाठलाग करतील, शिट्याही वाजवतील
तू जेव्हा गल्ली पार करून मुख्य रस्त्यावर पोहचशील
लोक तुला चरित्रहीन म्हणून शिव्याही देतील
जर तू निर्जीव असशील
तर परत फिरशील
नाहीतर
जशी जात आहेस तशीच चालत राहशील....

भारत महासत्ता होण्यासाठी स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे

 भारत देशाचा संपूर्ण जगात महासत्ता म्हणून लौकिक व्हावा असे सर्वानाच वाटते , पण त्यासाठी देशांतील स्त्री – पुरुषांमध्ये समानता असणे आवश्यक असल्याचे मत ठाणे येथील जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात केले. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील महालक्ष्मी लॉन्समध्ये हॅपी टू केअर या समाजिक संस्थेचे संस्थापक परेश ठाकरे , विजेता देशमुख , अनिल मराठे  यांच्या पुढाकाराने महिला अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या व महिला अधिकार विषयक माहिती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे येथील जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल , महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख निलीमा कुलकर्णी, महापौर आशा इदनानी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या अल्पनाताई पेंटर , शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर , राजेश वानखेडे , सुनिल सुर्वे , सुरेश जाधव , नगरसेविका अंजली साळवे , समीधा कोरडे , मंदा सोनकांबळे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलतांना न्या. अवसरमोल यांनी सांगितले की, 1976 साली डाटा बेस अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात महिलांवरील बलात्काराच्या वर्गवारीनुसार विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची संख्या 2919 एवढी होती. पुढे सन – 2010 मध्ये ही संख्या तब्बल 20, 262 अशी होती. त्यामुळे महिलांवर अन्याय व अत्याचार करणार्यांच्या मानसिकतेत वाढ कशी झाली?  या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच मानसिकता ही प्रत्येक घरातूनच सुदृढ होण्याची गरज असल्याचे परखड मत देखिल त्यांनी यावेळी व्यक्त केले.

एका ढोंगी बाबाच्या सांगण्यावरुन व्यवसायात बरकत हवी असल्याने एका बापाने स्वतःच्या मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर काही महिन्यांनी ती मुलगी गरोदर राहिली. या घटनेची माहिती झाल्यावर नागरिकांच्या म्हणण्यानुसार तिच्या बापाला अटक करण्यात आली. मात्र न्यायालयात खटला सुरू असतांना मुलीने, तिच्या आईने व बहिणीने साक्ष बदलली. त्यामुळे बापाला निर्दोष मुक्त करावे लागले. या घटनेचा उल्लेख न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल यांनी केल्यावर उपस्थित मान्यवर मंडळीचे डोळे पाणावुन गेले होते. महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख निलीमा कुलकर्णी यांनी महिला देखिल कायद्याचा गैरवापर करतात , त्यातुन पुरुषांवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतात असे सांगून कायद्याचा वापर चांगल्यासाठी करा आणि स्वावलंबी व संरक्षण करण्याचे आपल्या मुलींना शिकवण द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.